Viral Video:रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेला भरधाव कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. थरकाप उडवणारी ही घटना नोएडा सेक्टर 78 मधील महागण मॉडर्न सोसायटी परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा नारंग (वय 75 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारंग ह्या मॉडर्न सोसायटी परिसरात राहत होत्या.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्या फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात कार आली. काही कळण्याच्या आतच या कारने नारंग यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचे समोरील चाक नारंग यांच्या छातीवरुन गेले.या घटनेत नारंग यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर नारंग यांच्या कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रा दाखल करण्यात आली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
पहा व्हिडिओ
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






