अमळनेर नाक्या जवळील व्हेईकल अंडर बायपास प्रकरणी मा.नगराध्यक्ष देविदास महाजन यांची खासदारांशी चर्चा.

Spread the love

कार्यवाही करण्याचे खासदारांचे आश्वासन.

एरंडोल :- येथील राष्ट्रीय महामार्गा वरील जुन्या अमळनेर नाक्याजवळ वाहनधारकांना जाण्या येण्यासाठी व्हेईकल अंडर बायपास द्यावा तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूस बंद पडलेले समांतर रस्त्याचे काम पूर्ण करावे आदी महामार्गाच्या संबंधित नागरिकांच्या प्रश्नांबाबत माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांच्याशी चर्चा केली असून या संदर्भात नाही च्या अधिकाऱ्यांशी बोलून लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन खासदार पाटील यांनी महाजन यांना दिले आहे.

एरंडोल शहरालगत सध्या चौपदरीकरणासह उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून बहु अंशी काम पूर्ण झाले आहे परंतु बस स्थानकाकडील समांतर रस्त्याचे काम फक्त तिवारी व्यापारी संकुला पर्यंतच करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे पुढे हे काम बंद पडण्यामागे काही राजकारण तर नाही ना याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा आहे. तर महामार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर रस्ते होणे वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असताना याबाबत नाही चे अधिकारी केवळ चालढकल करीत असल्या मुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मात्र देर से आये दुरुस्त आये या उक्तीप्रमाणे आठ दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महामार्ग सुरळीत सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महामार्गावर सध्या सर्वत्र वाहतुकीचे प्रमाण देखील वाढले आहे त्यामुळे दिवस-रात्र या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते यातूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा तर्फे शहरालगत महामार्ग तयार करताना नागरिकांना सुरक्षापूर्वक रहदारी करण्यासाठी सुरुवातीपासूनच काही तृट्या जनहितार्थ पूर्ण न केल्यामुळे वाहनधारकांना शहरात जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे याचाच परिपाक म्हणून याच महामार्गावर जुन्या अमळनेर नाक्याजवळ नवीन वसाहती मधील नागरिकांना तसेच नंदगाव गावाकडील नागरिकांना व पोस्ट ऑफिस कार्यालयात जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकाना दैनंदिन रहदारीसाठी मोकळा रस्ता ठेवण्यात आला आहे

परंतु या ठिकाणी महामार्गावरून सरळ पुढे जाणाऱ्या तसेच शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनधारकांमुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो अशावेळी एखाद मोठा अपघात होण्याची भीती वांधारकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी असलेल्या दोन युवकांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर दैनंदिन किरकोळ अपघातांच्या घटनांत देखील वाढ झाली आहे . त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षतेसाठी या ठिकाणी व्हेईकल अंडर बायपास होणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी जनतेच्या या निगडित प्रश्नाबाबत

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उमेश पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून वाहनधारकांना दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्येची तीव्रता अवगत करून दिली खासदार महोदयांनी देखील या संदर्भात महाजन यांना नाही च्या अधिकाऱ्यांशी बोलून स्वतः अधिकाऱ्यांसमवेत स्पॉट निरीक्षण करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे आता वाहनधारकांचा हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा भाजपाचे नूतन सरचिटणीस निलेश परदेशी, किरण तोतले, सुभाष पाटील, पंडित साळी, संजय मानधने, यांचे सह वाहनधारकांची उपस्थिती होती.

हे पण वाचा

टीम झुंजार