चिखली तालुक्यातील एकलारा या गावातील पुनम राहुल महाळनकर ही विवाहित तरुणी आपल्या वडिलांकडे सेलू (जिल्हा परभणी) येथे माहेरी आली होती.
बुलढाणा : चिखली मेहकर रोडवरील आमखेड माळखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडिलांसोबत माहेरहून सासरी येत असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. समोरून नशेमध्ये वाहन चालवणाऱ्या चालकाच्या ताब्यातील दुधाच्या महिंद्रा पिकपने कारला जबर धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारमधील २२ वर्षीय विवाहित महिला ठार झाली असून दोघेजण जखमी झाले आहेत. सुदैवाने अपघातात दीड वर्षाचा चिमुकला सुखरूप बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील एकलारा येथील पुनम राहुल महाळनकर ही विवाहित महिला आपल्या वडिलांकडे सेलू, जिल्हा परभणी येथे माहेरी गेली होती. ११ ऑक्टोबर रोजी रात्री तिच्या वडिलांनी स्विफ्ट डिझायर कार भाड्याने आणली आणि पूनमला सासरी सोडवायला निघाले. मात्र ग्राम एकलव्यापासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतर असलेल्या चिखली मेहकर रोडवरील आमखेड मालखेड दरम्यान रात्री साडेबारा वाजता चिखलीकडून मेहकरकडे भरधाव वेगातील पिकअप वाहनाने कारला धडक दिली.
अपघातात कारचा मागील दरवाजा तुटला आणि पुनम गाडी बाहेर पडली. यामध्ये डोक्याला व हाताला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मात्र पूनमचा दीड वर्षीय मुलगा चिकू हा सुखरूप बचावला. तर सुनील दत्तात्रय रत्नपारखी, सुमित रमेश डायमा (दोघेही राहणार सेलू) यांना किरकोळ मार लागला. कारचालक हनुमंत सुंदरराव काळे हे सुद्धा जखमी झाले आहेत. हनुमान सुंदरराव काळे यांच्या तक्रारीवरून आरोपी चालक शैलेश उत्तम यादव याच्याविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






