Viral Video: सोशल मीडिया म्हणजे एकापेक्षा एक भन्नाट अन् तितक्याच चकित करणाऱ्या गोष्टींचा खजाना. सोशल मीडियामधून कधी कोण अन् कसा फेमस होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ कधी कधी इतके भयंकर आणि थक्क करणारे असतात की पाहणाऱ्यांनाही धक्का बसतो.सध्या अशाच एका तरुणाच्या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांना चक्रावून टाकले आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, जाणून घेवू सविस्तर.
सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात.
हे व्हिडिओ कधी पोटधरुन हसायला लावतात तर कधी चक्रावून टाकतात. सध्या अशाच एका तरुणाच्या व्हिडिओने सर्वांना कोड्यात टाकले आहे. हा व्हिडिओ एका तरुणाचा आणि त्याच्या अशक्य अशा सायकलवरील कौशल्याचा आहे. अशक्य यासाठी की हा तरुण चक्क डोक्यावर भलामोठा फ्रीज घेवून जोरात, सुसाट सायकल चालवताना दिसत आहे. तरुणाचे हे अशक्य वाटणारे कौशल्य आणि धाडस पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ परदेशातील न्यूयॉर्क शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण सायकल चालवता चालवता डोक्यावर फ्रीज ठेवतो आणि गर्दीतून, वर्दळीच्या रस्त्यावरुन मार्ग काढत अगदी आरामात सायकल चालवत आहे. विशेष म्हणजे सायकल चालवताना त्याचा कुठेही तोल गेला नाही, किंवा त्या फ्रीजला हात लावण्याची गरजही लागली नाही.
त्याचे हे सायकल चालवण्याचे अनोखे कौशल्य रस्त्यावर येणा- जाणारेही थक्क होऊन पाहत आहेत. अनेकांना हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरला नाही.सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरीही चकित झाले आहेत.त्याच्या या कौशल्याचे कौतुक करताना अनेकांनी हे कसे शक्य आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. तर काही जणांनी याला सर्कशीत जायला पाहिजे, असा सल्लाही दिला आहे. थोडक्यात या अफलातून सायकल चालवणाऱ्या तरुणाने सध्या इंटरनेवर धुमाकूळ घातला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






