जळगाव:- देशभरात शारदीय नवरात्री महोत्सवास प्रारंभ झाला आहे. मात्र, या घटनेच्या पहिल्याच दिवशी एक दुर्वैवी घटना घडली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त बऱ्हाणपूर येथून देवीची मूर्ती घेऊन परतात असताना अपघात झाल्याने देवीची मूर्ती अंगावर पडून तरुणाचा मृत्यू झाला.
मृत तरुण जळगावच्या मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथील असून पुर्नाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाला. या घटनेनंतर मेहरूण परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय उर्फ जितू गोपाल कोळी (वय 25 रा. जोशी वाडा, मेहरूण) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कॉलनीत नवरात्र उत्सवानिमित्त देवी बसवण्यासाठी तयारी चालली होती. त्याकरिता देवीची मूर्ती बऱ्हाणपूर येथून आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी गेलेले होते. तेथून परतत असताना रात्रीच्या सुमारास पुर्नाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये देवीची मूर्ती जितू उर्फ संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने त्याच्याखाली दाबून त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर त्याच्या मित्रांनी तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. कुटुंबियांनी तर एकच आक्रोश केला. एमआयडीसी जळगाव येथील एका कंपनीमध्ये तो खिडक्यांच्या सेंटरिंगचे काम करीत होता. दरम्यान मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जितू उर्फ संजय कोळी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. तर दुसरीकडे नवरात्री महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अशी घटना घडल्याने उत्सवाला गालबोट लागलं आहे.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४