ViralVideo:धबधब्यात करीत होते मस्ती अचानक पाण्याचा प्रवाह आला जोरात; 5 सेकंदात अंगावर मृत्यू कोसळला, पहा व्हिडिओ.

Spread the love

ViralVideo: जगात अनेक प्रकारचे अॅडव्हेंचरस स्पॉट्स आहेत. यामध्ये धबधब्यांचाही समावेश आहे. निसर्गाने हे अतिशय विलोभनीय दृश्यं निर्माण केले आहेत. काही ठिकाणी उंचावरून कोसळणारे धबधबे लोकांना भुरळ घालतात.
परदेशात क्वचितच असे कोणते धबधबे असतील जिथे लोकांना त्यात आंघोळ करण्याची परवानगी आहे. याचं कारण म्हणजे, जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता. होय, उंचावरून पडणाऱ्या पाण्यामुळे कधीही दुर्घटना घडू शकते. याच कारणामुळे या धबधब्यांमध्ये मजा-मस्ती करण्यास बंदी असते, पण भारतातील परिस्थिती वेगळी आहे.

भारतात अनेक ठिकाणी धबधबे आहेत. यामध्ये लोक आरामात आंघोळ करतानाही दिसतात. अशा अनेक घटना तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतील ज्यात धबधब्यात बुडून लोकांचा मृत्यू होतो. यानंतरही लोक यातून धडा घेत नाहीत. नुकताच अशाच एका धबधब्यावर झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पाण्यातली मजा केव्हा मोठ्या संकटात रूपांतरित झाली ते कोणाला कळलंच नाही.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक लोक धबधब्यात आंघोळ करताना दिसत आहेत. ते मस्ती करत असतानाच अचानक पाण्याचा प्रवाह जोरात आला. लोकांना काही समजेल आणि ते पाण्यातून बाहेर येतील तोपर्यंत पाण्याने भीषण रूप धारण केलं होतं. काही वेळापूर्वी पाण्यात आंघोळ करताना मौजमजा करत असलेले लोक पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले लोकही पाण्याच्या प्रवाहाचा वेग पाहून घाबरले आणि बाहेर पळू लागले.

या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. पाण्यासोबत मस्ती करणाऱ्या लोकांना निसर्ग कसा धडा शिकवतो, याचं हे उदाहरण आहे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी यावर शोक व्यक्त केला. एका यूजरने लिहिलं की, अनेकदा सल्ला देऊनही अनेक लोक पाण्याखाली जातात आणि आंघोळ करतात. त्याचाच परिणाम हा अपघात आहे. या कारणास्तव निसर्गाशी खेळ करू नये, असे अनेकांनी लिहिलं.

https://www.instagram.com/reel/Cu7YhwxM21k/?igshid=MzRlODBiNWFlZA==

हे पण वाचा


टीम झुंजार