भिवंडी :- एक संतापजनक बातमी समोर आली आहे. भिवंडीत एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. सात जणांच्या टोळक्याने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.यातील चार आरोपीना पोलिसांनी सोमवारी अटक केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातमधील एक आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचा होता. त्याने पीडितेला खरबाव रेल्वे स्थानकाजवळ बोलवलं होतं. अल्पवयीन मुलगी तिथे गेल्यानंतर या सात नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर आरोपींची तिला, याबाबत कोणाला काहीही सांगू नकोस’, असं धमकावत सांगितलं.

झालेल्या घटनेनंतर पीडित मुलगी खूपच घाबरलेली होती. यामुळेच तिने झालेल्या घटनेबद्दल कोणाला काहीच सांगितलं नाही, तसेच पोलिसात याची तक्रारही नोंदवली नाही. मात्र नंतर तिने आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे, असं ठरवलं आणि हिंमत एकवटून पोलिसात तक्रार दाखल केली.
पीडितेने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्यांच्यावर ३७६डी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. यामधील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






