धार्मिक गाणे लावण्याच्या कारणावरून दोघांवर प्राणघातक हल्ला,एरंडोल तालुक्यातील घटना.

Spread the love

एरंडोल :- दुर्गोत्सवात धार्मिक गाणे लावण्याच्या कारणावरून दोन युवकांवर फायटरने हल्ला करून मारहाण केल्याची घटना काल (ता.१९) रोजी रात्री आठ
वाजेच्या सुमारास रिंगणगाव येथे घडली.या मारहाणीत दोन युवक गंभीर जखमी झाले असून पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी,की रिंगणगाव (ता.एरंडोल) येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास रोहित रामदास मराठे (वय-२०) दुर्गादेवी मंडळाजवळ बसला होता.दुर्गोत्सवात धार्मिक गाणे लावण्यात आले होते.

त्यावेळी गावातील अरबाज रफिक खाटिक व मोईन मुखत्यार मणियार हे दोन युवक त्याठिकाणी आले आणि रोहित मराठे यास हरामखोर तू जास्त मातला आहेस असे म्हणून शिवीगाळ करू लागले.मोईन मुखत्यार मणियार याने हातातील लोखंडी फायटरने रोहितच्या कां,छाती व पोटात मारून जखमी केले.भांडणाचा आवाज एकूण रोहित याचा मामेभाऊ वैभव मराठे हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यास देखील अरबाज खाटिक व मोईन मणियार यांनी मारहाण करून जखमी केले.गावातील भूषण महाजन, अनिल महाजन यांचेसह ग्रामस्थांनी वाड मिटवले.

रोहित मराठे व वैभव मराठे यांना जखमी झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यांचेवर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात
आले.याबाबत रोहित मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस स्थानकात अरबाज खाटिक व मोईन मणियार यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.दोन्ही संशयित मारहाण करून फरार झाले
असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार