मुजफ्फरपूर: (बिहार) :- मध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे सख्या बहिणीने आपल्या विवाहित बहिणीला तीन मुलांच्या वडिलांना 51 हजार रुपयांना विकले असल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखळ केली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. वेश्या व्यवसायासाठी महिलेची विक्री झाल्याचे सांगण्यात आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
बहिणाला ठेवले अंधारात
बिहारमधील मुजफ्फरपूरमधील सकरा परिसरातील ही घटना असून एका विवाहित महिलेने आपल्या सख्या बहिणीची विक्री केली आहे. या घटनेची माहिती मिळताच त्या महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. ही घटना घडण्याआधी महिलेच्या बहिणीने तिला आधी समस्तीपूरमध्ये जेवणासाठी बोलवून घेतले होते.
बाळ असतानाही केला सौदा
समस्तीपूरमध्ये लग्न करण्याच्या हेतून गावातीलच एका व्यक्तीबरोबर तिने आपल्या बहिणीचा 51 हजार रुपयांना सौदा केला होता. बहिणीकडे गेलेली बायको पुन्हा गावी परत आलीच नसल्याने तिचा नवरा आपल्या मेहुणीकडे गेला. त्यानंतर त्यांचे सहा महिनेच बाळ त्याच्या हातात देऊन तुमची पत्नी कुठेतरी बाहेर गेल्याचे सांगितले.
महिलेला फक्त 51 हजारांना विकले
गावात गेल्यानंतर सौदा झालेल्या महिलेच्या पतीने गावातील तरुणांबरोबर चर्चा केल्या नंतर त्यांना ही गोष्ट समजली. त्यांनी सांगितले की, महिलेला त्याच गावातील एका व्यक्तीला 51 हजार रुपयांना विकण्यात आले असून त्याच व्यक्तीबरोबर त्या महिलेने त्याच्याबरोबर लग्न केले असल्याची माहितीही त्याला समजली. त्यानंतर महिलेचा पती गावातील लोकप्रतिनिधींसह आपल्या मेहुणीच्या घरी गेला. त्यावेळी ती भेटली नाही. त्यामुळे त्यांनी मग पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसात तक्रार दाखल करताना त्यामध्ये आपल्या पत्नीला वेश्याव्यवसाय करण्यासाठी तिचा सौदा करण्यात आल्याची तक्रारीत म्हटले आहे.
प्रेम प्रकरणातून घडली घटना
या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असली तरी पोलिसांनी सांगितले की प्रेमप्रसंगातून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. मात्र आता महिलेची विक्री झाल्याचे समजल्यानंतर त्यानुसार आता तपास सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

तीन मुलांच्या बापाबरोबर सौदा
या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर सांगण्यात आले की, 8 दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेला तिच्या बहिणीकडून तीन मुलं असणाऱ्या पुरुषाबरोबर बहिणीचा सौदा केला होता. त्यानंतर त्या महिलेचा पती पत्नीला घेऊन जाण्यासाठी आला तरी तिने सहा महिन्याच्या बाळाला त्याच्या हातात देऊन ती कुठेतरी बाहेर गेल्याचे तिने सांगितले. त्यामुळे तिचा संशय आल्यामुळेच माहिती काढल्यावर माझ्या बायकोचा तिच्या सख्ख्या बहिणीने सौदा केला होता असंही त्यांनी सांगितले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






