Video: सध्या सर्वत्र नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. तसेच आजचा रंग निळा आहे. गरबा आणि दांडियाला नवरात्रीत विशेष महत्व असते. अनेक जण उत्साहात पारंपरिक व पाश्चिमात्य पोशाख घालून त्यांच्या आवडीनुसार गरबा खेळतात. तर आज केरळमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. केरळच्या रस्त्यावर माणसांची एकच गर्दी जमली आहे. कारण-स्त्रिया या व्हिडीओत एक अनोखा डान्स करताना दिसत आहेत, जो अगदीच नवरात्रीत खेळण्यात येणाऱ्या दांडियासारखा आहे .
व्हायरल व्हिडीओ केरळचा आहे. केरळमध्ये एक अनोखा डान्स रंगला आहे. रस्त्यावर स्त्रिया एकमेकांसमोर उभ्या आहेत आणि सगळ्यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच या डान्ससाठी लाकडाच्या काठ्यांची मदत घेण्यात आली आहे. स्त्रियांना दोन गटात विभागले आहे. तसेच दोन-दोन स्त्रियांच्या जोड्या काठीच्या मदतीने एकमेकींसोबत हा अनोखा डान्स सादर करत आहेत. तसेच तुम्ही व्हिडीओ पाहिलात तर तुम्हाला हा नवरात्रीत खेळण्यात येणाऱ्या दांडियासारखा वाटेल; जो या महिला काठ्यांनी खेळत आहेत. एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.
केरळमध्ये रंगला अनोखा खेळ :
केरळमध्ये स्त्रिया एकत्र मिळून रस्त्यावर अनोखा डान्स करताना दिसल्या आहेत. स्त्रिया गाण्याच्या तालावर एकसाथ पावलं टाकत आहेत व त्या दरम्यान त्यांच्या काठ्यांच्या हालचालीसुद्धा अगदी चोख करताना दिसत आहेत. एकंदरीतच केरळच्या रस्त्यावर हे अनोखं दृश्य पहायला मिळालं आहे आणि केरळमधील हे काठ्यांचे नृत्य अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा डान्स करताना स्त्रियांनी पायातील चप्पलदेखील काढून ठेवली आहे आणि अशाप्रकारे केरळमध्ये अनोखा ‘दांडिया’ पहायला मिळाला आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी हा व्हिडीओ त्यांच्या @shashitharur या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच गुजराती बहिणींनी लक्ष द्या! या नवरात्रीत केरळमधील दांडिया पाहा… असे खास कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण स्त्रियांच्या नृत्याचे कौतुक करत आहेत, तर काठ्यांच्या मदतीने करण्यात आलेला हा डान्स अनेकांच्या पसंतीस उतरत आहे, असे ते कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत. तर केरळचा हा गरबा सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






