एरंडोल :- येथील माजी उपनगराध्यक्ष तथा युवक कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष योगेश महाजन यांची मध्यप्रदेशातील नेपानगर विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.मध्यप्रदेशचे प्रभारी तथा राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्या आदेशाने अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय दत्त यांनी पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आल्याचे योगेश महाजन यांना कळवले आहे.
योगेश महाजन कॉंग्रेसचे माजी नगरसेवक असून त्यांनी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून युवकांना पक्षात समावेश करून पक्षसंघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता.२०१८ मध्ये झालेल्या मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षाने त्यांची दोन मतदार संघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली होती.योगेश महाजन यांची निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे पक्षाच्या पदाधिका-यांनी स्वागत केले.पक्षाने निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्यामुळे जबाबदारी वाढली असून या मतदार संघातून कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे योगेश महाजन यांनी सांगितले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






