कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरातील उमा दर्शन सोसायटीमध्ये राहणारे पटेल कुटुंबीय काल गरबा खेळण्यासाठी शहाड पाटीदार भवन येथे गेले होते.
कल्याण : गरबा खेळण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरातून चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मिळून ३५ लाख ८८ हजाराचा मुद्देमान लंपास केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीचा वॉचमन गगन बहादूर व त्याची पत्नी सुमन बहादूर यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघड झाले आहार. घटनेनंतर हे दोघे पती-पत्नी नेपाळ पळून गेल्याची माहिती समोर येतेय. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत या दोन्ही फरार चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरातील उमा दर्शन सोसायटीमध्ये राहणारे पटेल कुटुंबीय काल गरबा खेळण्यासाठी शहाड पाटीदार भवन येथे गेले होते. गरबा खेळून घरी परतल्यानंतर त्यांना घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांना माहिती देण्यात आली. महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या इमारतीत वॉचमन म्हणून काम करणारे गगन बहादुर व त्याची पत्नी सुमन बहादूर यांनी

आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने इमारतीच्या डक मध्ये शिडी लावून पटेल यांच्या घराच्या बाथरूमच्या खिडकीतून घरात शिरले . बेडरूम मधील कपाट फोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा मिळून ३५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले . पोलिसांनी गुन्हा दाखल करत या दोघांचा शोध सुरू केला. हे दोघेही नेपाळला पळून गेल्याची माहिती आता समोर येतेय. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






