चिखली :- घराची रखवाली करता करता वॉचमनने त्याच घरात दरोडा टाकण्याचा कट रचला. त्याने त्याची पत्नी आणि इतर साथीदारांना बोलावून घरातील माय लेकीला बांधून घातले. त्यानंतर घरातील दागिने आणि रोख रक्कम असा 23 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला.ही घटना दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चिखली येथे घडली.
वॉचमन महेश सुनार, त्याची पत्नी लक्ष्मी, त्याचा भाऊ कालु, त्याची पत्नी व इतर दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश सुनार हा फिर्यादी यांच्याकडे वॉचमन म्हणून काम करीत होता. मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आरोपी महेश सुनार याने फिर्यादी व तिच्या आईला बहाणा करून खाली बोलविले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या आईचे हातपाय बेडशिट आणि ओढणीच्या सहाय्याने बांधून ठेवले.

‘अगर मुंह से आवाज निकाला तो जान से मार दुंगा’ अशी आरोपींनी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी घरात जाऊन सोने-चांदी व हिऱ्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 23 लाख 60 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच जाताना पुरावा राहू नये यासाठी घरातील डीव्हीआर देखील जबरदस्तीने चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






