मुरादाबाद:- (उत्तर प्रदेश) तील येथे एकाच कुटूंबातील एकाच दिवशी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. महिलेचा मृत्यू आधी झाला तर त्याचवेळी महिलेच्याा मृत्यूनंतर अवघ्या दीड तासातंच तिच्या पतीचाही दुसऱ्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यू नंतर गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यास आले होते. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले.
महमूदपूर माफी गावातील रहिवासी विमला देवी आपल्या मुलासह बाईक वरुन घरी जात असताना लाडूपूरा गावाजवळ मागून दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात विमला गंभीर जखमी झाल्या त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात होती.

विमला यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या पतीला देण्यात आली. इतर कुटुंबातील सदस्यांना देखील त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. घरातून दुसऱ्या मुलासह श्यामलाल रुग्णालयासाठी निघाले. रुग्णालयाच्या समोरून रस्ता ओलाडंताना एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर येऊन धडक दिली. याच धडकेत ते भरपुर गंभीर झाले.या अपघातात श्मामलाल यांचा वेदनादायक मृत्यू झाला. मात्र, धडक दिल्यानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

लोकांनी फरार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो फरार झाला. या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली आहे. पोलिस या घटनेअंतर्गत फरार व्यक्तीच्या शोधात आहे. कुटुंबातिल एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने घराच्यांना खुप मोठा धक्का बसला आहे. गावाकऱ्यांनी खुप मोठा हंबरडा फोडला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्दात गुन्हा नोंदवला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






