सोमवार दि.३० रोजी एरंडोल तालुका स्टॅम्प वेंडर संघटनेचे कामबंद आंदोलन –

Spread the love

एरंडोल : – अखिल भारतीय स्टॅम्प वेंडर संघटना एरंडोल तर्फे विविध मागण्यासाठी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी एरंडोल तहसीलदार कार्यलय समोर एक दिवसीये धरणे आंदोलन व कामबंद आंदोलन आहे.यात शासन 100,500, रुपये चे स्टॅम्प पेपर बंद करणार आहे, त्यामुळे वेंडर लोकांना उपासमारी चा सामान करावा लागणार आहे, तसेच स्टॅम्प पेपर छपाई बंद करू नये, फ्रँकिंग मशीन वेंडर लोकांना मिळावे, कमिशन 3 टक्के वरून 10टक्के करण्यात यावे, प्रत्येक तालुका स्तरीय नवीन प्रशासकीय इमारत मध्ये वेंडर लोकांना बसण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यासाठी हे आंदोलन आहे.

या सबंधी तहसीलदार सौ. सुचिता चव्हाण, दुय्यम निबंधक श्री संजय नाईक, पोलीस निरीक्षक सतीश गोराळे आदिना निवेदन देताना वेंडर संघांचे किशोर निंबाळकर, रघुनाथ चौधरी, हिरामण चव्हाण, शालिग्राम पवार, साहेबराव पानपाटील, पांडुरंग मोरे, किशोर चौधरी, योगराज ठाकूर, अशोक ब्राहमे, ज्ञानेश्वर पाटील, जावेद मुजावर, राजू गोसावी, रवींद्र निंबाळकर, योगेश पाटील, गोकुळ वालडे आदी उपस्थित होते

हे पण वाचा

टीम झुंजार