कन्नड :- लैला-मजनूपासून ते हीर-रांझापर्यंत प्रेमाच्या अनेक किस्से ऐकले असतील, पण एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने मुलीशी मैत्री केल्यानंतर, तिला घेऊन फिरण्यासाठी आणि चित्रपट दाखवण्यासाठी खर्च केलेले सर्व पैसे परत करण्याची मागणी केली आहे.मुलीने प्रेम नाकारल्यामुळे तरुणाने हे सर्व केलं.कर्नाटकातील एका मुलीने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मैत्री करणाऱ्या मुलाकडून छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.
कन्नड जिल्ह्यातील भटकल शहराजवळील हदावल्ली गावातील नेत्रा गोवाली असं मृत मुलीचं नाव आहे. मुलीच्या वडिलांनी तिचा इन्स्टाग्राम मित्र गोवर्धन मोगर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीला एक वर्षापासून ओळखत होता आणि त्याने प्रेमासाठी तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.
जेव्हा तिने त्याची ऑफर नाकारली तेव्हा त्याने तिच्यावर खर्च केलेले सर्व पैसे परत करण्यास सांगितले आणि त्रास देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने तिला ब्लॅकमेल करून तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर झालेला छळ सहन न झाल्याने मुलीने बुधवारी हे टोकाचं पाऊल उचललं. भटकल ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






