Viral Video: लोकल ट्रेन असो, की एसटी बस जागेसाठी प्रवाशांमध्ये नेहमी भांडणं होत असतात. कधी भांडणं सल्लामसलतीने सोडवली जातात. तर काही वेळा ती विकोपाला देखील जातात. यावरुन पुढे हाणामारीच्या घटना घडतात.अशीच एक घटना राजधानी दिल्लीतून समोर आली आहे.
यामध्ये बसमध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरुन दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) काही प्रवासी बसमधून प्रवास करताना दिसून येत आहे. बसमध्ये गर्दी असल्यामुळे काही प्रवासी उभे राहून प्रवास करताना दिसून येत आहे. अचानक सीटवर बसण्याच्या रागातून दोन महिलांमध्ये बाचाबाची सुरू होते. वाद इतका विकोपाला जातो की दोन्ही महिलांमध्ये हाणामारी सुरू होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवासी चक्रावून जातात काहीजण या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मात्र, तरी देखील या महिला एकमेकांचे केस ओढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहे.याशिवाय दोन्ही महिलांकडून एकमेकांना शिवीगाळ देखील केली जात आहे. हा व्हिडीओ ‘DELHIBUSES1’ या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी बघितला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






