तृतीयपंथी समुदायाला संधीची समानता या संविधानीक मुल्यानुसार जगण्याची संधी द्या राज्य समन्वयक: शमिभा पाटील

Spread the love

तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण जामनेर (प्रतिनिधी):- तृतीयपंथी हक्क व संरक्षण विधेयक २०१९ व नालसा निकाल २०१४ अन्वये पारलिंगी(तृतीयपंथी)समुदायाला संविधानाच्या मुल्यानुसार सन्मानाने जिवन जगण्यासाठी समानतेची संधी उपलब्ध करून द्यावी.असे स्पष्ट म्हटले असताना राज्य शासन मात्र या बाबतीत उदासीन असल्याचे दिसते.त्या अनुषंगाने तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक शमिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

पोलिस भरती व इतर आरक्षण लागु होत असलेल्या क्षेत्रात समांतर आरक्षण म्हणजेच जाती प्रवर्गाप्रमाणे महिलांसाठी राखीव असते.त्याचप्रमाणे तृतीयपंथी राखीव अशी.तरतूद करण्यात यावी.३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील तृतीयपंथी घटकातील वर्गास शिक्षण, नोकरी, तसेच शासकीय योजनांमध्ये लिंग या पर्यायामध्ये स्त्री पुरूषा सोबत तृतीयपंथी हा पर्याय खुला ठेवण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख आहे परंतु पोलिस भरती प्रमाणे राज्यात विविध विभागांतर्गत वेगवेगळ्या भरती प्रक्रिया राबविल्या जातात त्यातही विषेश तरतुद करून तृतीयपंथी समुदायातील घटकांना शासकीय सेवेत निकषानुसार समाविष्ट करावे.

सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा पातळीवर चालणाऱ्या कामासाठी कार्यालयीन प्रतिनिधी म्हणून शैक्षणिक अर्हता पुर्ण करणाऱ्या समुदायातील घटकाला कर्मचारी पदी नेमणूक द्यावी.समुदायातील शिक्षण घेणाऱ्या घटकास सामाजिक न्याय विभागाच्या वतीने असलेल्या वसतिगृहात रहिवास व भोजनाची निशुल्क व्यवस्था,शैक्षणिक शुल्कात माफी व रूपये ५००० भत्ता देण्यात यावा.उच्च शिक्षण व विदेशात शिक्षणासाठी पात्रतृतीयपंथी व्यक्तीस विशेष अर्थासहाय्य देण्यात यावे.ग्रामीण,निम-शहर,शहर,महानगरांमधील आवास योजनांचा लाभ जागेसहित उपलब्ध करून द्यावा.

तसेच यासाठी आवश्यक असलेल्या. कागदपत्रांच्या अटी शिथिल कराव्या अशा मागण्या समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.मागण्यांविषयी शासनाच्या वतीने समुदायाला आश्वस्त केले जात नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने लढा चालूच राहणार असल्याचा निर्धार उपोषणकर्ते पार्वती जोगी,शमिभा पाटील ,मयुरी आवळेकर,सोनल पाटील, मिरा पाटील, झोया शिरोळे,गुंजन मेढे,अंजली पाटील, निकिता मुख्यदल चांद तडवी,वैरेही वराडे,विजया वसावे,त्रषाली शेख,रोहिणी जगदाळे यांनी व्यक्त केला. दरम्यान उपोषणकर्ते आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध करीत फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत आपला विरोध नोंदविला.

टीम झुंजार