मित्रांसोबत खेळत असलेल्या 9 वर्षीय मुलाला स्कूल व्हॅनने चिरडले; पहा धक्कादायक घटनेचा CCTV व्हिडिओ.

Spread the love

CCTV VIDEO: मित्रांसोबत खेळत असलेल्या एका 9 वर्षीय मुलाला स्कूल व्हॅनने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे. या घटनेत 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आपल्या घरापासून 100 मीटर अंतरावर हा मुलगा मित्रांसोबत खेळत होता आणि त्यावेळी ही घटना घडली आहे. ही घटना इंदूर येथील परदेशीपुरा परिसरात घडली आहे. 21 ऑक्टोबर रोजी 9 वर्षीय आशिष हा आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर गेला.

मित्रांसोबत खेळत असताना समोरुन भरधाव स्कूल व्हॅन आली आणि आशिष शर्मा याला धडक दिली. आशिषला धडक दिल्यावर तो खाली कोसळला. त्यानंतर स्कूल व्हॅनने त्याला चिरडले. आशिष सोबत खेळणारे त्याचे मित्र आणि त्या परिसरात असलेल्या एका महिलेने हे पाहिले आणि व्हॅन चालकाला रोखले. त्यानंतर आशिषला उचलून तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्कूल व्हॅन सुद्धा जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळच्या सुमारास आशिष हा घरातून बाहेर खेळण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत तो खेळत असताना पाठीमागून स्कूल व्हॅन आली. या स्कूल व्हॅनखाली आशिष चिरडला गेला. आशिषला उपचारासाठी एमवाय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र, रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.आशिष याचे वडील सुद्धा ड्रायव्हर आहेत.

त्याला एकूण दोन भावंड आहेत. तीन भावंडांपैकी आशिष हा सर्वात लहान होता. घरापासून 100 मीटर अंतरावर तो मित्रांसोबत खेळत असताना ही घटना घडली आणि त्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार