अयोध्या : रामाची नगरी असलेल्या अयोध्येत बुधवारी रात्री एक संतापजनक घटना समोर आलीय. भंडाऱ्यासाठी गेलेल्या 7 वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीनं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकंच नव्हे तर नराधमानं तिच्यावर बलात्कार करुन तिला गंभीर अवस्थेत सोडून पळ काढला.
पीडित अल्पवयीन मुलीला उपचारासाठी श्री राम रुग्णालयात नेण्यात आलं. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला विभागीय रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर मुलीची प्रकृती आणखीन खालावल्यानं विभागीय रुग्णालयातून लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.






