खळबळजनक! आईला घराबाहेर काढलं म्हणून वडिलांशी झालं जोरदार भांडण,१६ वर्षीय मुलाने उचललं टोकाचं पाऊल.

Spread the love

पलामू (झारखंड):- जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका १६ वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या केली आहे. वडिलांशी झालेल्या भांडणानंतर मुलाने टोकाचं पाऊल उचललं. वडिलांवर हल्ला करून मुलगा तिथून पळून गेला. या मुलाच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीला घरातून बाहेर काढलं होतं. त्यामुळे मुलाचं आणि वडिलांचं मोठं भांडण झालं. या भांडणादरम्यान मुलाने चाकू भोसकून वडिलांची हत्या केली आणि तिथून पळून गेला.

छोटू शर्मा असं मृत पित्याचं नाव असून ते पलामूतल्या प्रक्रिया गावातील रहिवासी होते. दरम्यान, नवाजयपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, या घटनेच्या आदल्या दिवशी छोटू शर्मा यांनी पत्नीशी भांडण केलं होतं. तसेच पत्नीला जबर मारहाण करून तिला घरातून हाकलून दिलं होतं. वडिलांच्या या कृत्यामुळे मुलगा संतापला आणि वडिलांशी वाद घातला.

दोघांमध्ये भांडण सुरू होतं. तेव्हा मुलाने वडिलांची चाकूने भोसकून हत्या केली. वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात तिथेच टाकून तो तिथून पळून गेला. आरोपीच्या चुलत भावाने आरोपीला त्याच्या वडिलांना चाकूने भोसकताना पाहिलं आणि आरडाओरड केली. त्यानंतर आजूबाजूचे लोक घरात जमले. तोवर आरोपी तिथून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार