एरंडोल :- क्रीडास्पर्धांच्या आयोजनामुळे खेळाडूंना संधी उपलब्ध होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले. जिल्हा कबड्डी असोसिएशन,एरंडोल येथील क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक ५० वी कुमार-कुमारी गटातील जिल्हा अजीक्यापद व निवड चाचणी स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी स्पर्धेत विजयी झालेल्या कबड्डी संघांना आमदार
चिमणराव पाटील यांच्याहस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील अध्यक्षस्थानी होते.माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, राजेंद्र चौधरी,मुख्याधिकारी विकास नवाळे,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,पोलीस निरीक्षक सतिश गोराडे प्रमुख पाहुणे होते.स्पर्धेस खेळाडूंसह
क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
क्रीडा प्रबोधिनीच्यावतीने रा.ति.काबरे विद्यालयाच्या पटांगणावर स्व.कुशलदादा तिवारी क्रीडानगरीत निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस सुरु असलेल्या कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी
युवा खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.स्पर्धेत मुलांचे ४३ तर मुलींचे अकरा असे ५४ संघ सहभागी झाले होते.स्पर्धेत कुमार गटात जळगाव येथील कैलास क्रीडा मंडळ संघाने प्रतःम,चाळीसगाव येथील वसंतराव नाईक क्रीडा मंडळ संघाने द्वितीय तर रावेर येथील सरदार जी.जी.स्पोर्टस क्लब संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

कुमारी गटात रावेर येथील स्वामी स्पोर्ट्स
क्लब संघाने प्रथम,रावेर येथील सरदार जी.जी.पटेल स्पोर्ट्स क्लब संघाने द्वितीय तर एरंडोल येथील छत्रपती क्रीडा मंडळ संघाने तृतीय क्रमांक मिळवला.आमदार चिमणराव पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या
संघांना बक्षिस वाटप करण्यात आले.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या स्पर्धेमुळे ग्रामीण
भागातील खेळाडूंना क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. खेळाडूंना शासकीय नौक-यांमध्ये प्राधान्य मिळत असल्यामुळे प्रत्येक क्रीडा स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचेसह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. स्पधेस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,शहरप्रमुख
आनंदा चौधरी (भगत),संघटक मयूर महाजन,युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,चिंतामण पाटील,डॉ.राजेंद्र चौधरी,युवा
उद्योजक समाधान पाटील,धनश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राहुल तिवारी,प्रवाराज पाटील,गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल पाटील,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील,गोविंद बिर्ला यांचेसह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेसाठी क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष राकेश चौधरी,उपाध्यक्ष
डॉ.राहुल वाघ,खजिनदार गणेश भोई,सहखजिनदार विजय पाटील,सचिव दीपक वाल्डे यांचेसह शहरातील विविध क्रीडा मंडळांचे पदाधिका-यांनी सहकार्य केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






