जामनेर :- मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत, २९ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय महिला आपल्या दोन मुली व परिवारासह वास्तव्यास आहे. पीडित महिलेने दिलेल्या फियादीनुसार, गावात राहणारा विक्की पाटील (२५) हा दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता फियादीच्या घरात घुसला. दरम्यान, फिर्यादीच्या मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केला.
या प्रकरणी पीडित महिलेने बुधवार, १ नोव्हेंबर रोजी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी विक्की पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






