जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
आज आपण खूप संवेदनशील राहाल. त्यामुळे कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. स्थावर मिळकती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ आणि शारीरिक अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांसाठी मध्यम काळ आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्त्री वर्गापासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.
वृषभ:
श्रीगणेश कृपेने आज शरीर आणि मन स्वस्थ आणि प्रफुल्लित राहील. घरातील व्यक्तींबरोबर घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसोबत प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. भाग्योदय होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास आणि सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल आणि प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.
मिथुन:
श्रीगणेश सांगतात की थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. विद्यार्जनाच्या दृष्टीने विद्यार्थांना मध्यम दिवस आहे. स्नेही आणि मित्र परिवाराच्या भेटीने आनंद होईल. धंद्यात वातावरण अनुकूल राहील. उत्पन्नात वाढ होईल.
कर्क:
श्रीगणेश सांगतात की आज भावनांच्या प्रवाहात मश्गुल राहाल आणि कुटुंबीय व स्नेही, नातलग त्यात सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. स्वादपूर्ण जेवण आणि बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील. धनलाभ होईल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.
सिंह:
आज जास्त चिंता आणि भावनाशील राहिल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वादविवादामुळे भांडण निर्माण होईल. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. उक्ती आणि कृती यात संयम राखणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक होईल. कोणाचे गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्या.
कन्या:
आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यापार- धंद्याच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख- शांती लाभेल. पत्नी, मुलगा, वडीलधारे यांचेकडून लाभ होईल. मित्रांसोबत रम्य पर्यटन कराल. स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील. संततीकडून शुभवार्ता मिळतील.

तूळ:
घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. ऑफिस व नोकरीत उत्पन्न वाढ आणि पदोन्नती साठी सुयोग निर्माण होतील. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांकडून कामाची स्तुती होईल आणि त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल. सहकारी सहकार्य करतील. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.
वृश्चिक:
आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा आणि आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्यांशी वादविवाद करू नका असे श्रीगणेश सांगतात. परदेश गमनाच्या संधी येतील. परदेशात वास्तव्यास असणार्या निकटवरर्गीयां बद्दल वार्ता मिळतील. संततीविषयक चिंता राहील.
धनु:
श्रीगणेश सांगतात की आज आपण वाणी आणि संताप यावर आवर घाला अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे तब्बेत खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह आणि अनैतिक कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.

मकर:
विचार आणि व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय आणि मित्रां समवेत दिवस आनंदात घालवाल. शरीर आणि मन स्फूर्ती आणि प्रसन्नतेने भरेल. व्यवसायवाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इ. मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. भागीदारीत लाभ होईल. सामाजिक जीवनात मान- प्रतिष्ठा वाढेल. यात्रा घडण्याची शक्यता आहे. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण राहील. श्रीगणेशाची आपणावर कृपा राहील.
कुंभ:
आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती आणि सफलता मिळेल असे श्रीगणेश सांगतात. परिवारात ताळ-मेळ चांगला राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आपले विचार आणि व्यवहार यांत हळवेपणा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. नोकराकडून आणि मातुल घराण्याकडून लाभ होईल. कामासाठी पैसा खर्च होईल. विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.
मीन:-
कल्पना विश्वात विचारणा करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखून द्याल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. प्रेमिक आणि प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. कामुकता जास्त राहील. शेअर- सट्टा बाजारात लाभ होईल. मानसिक समतोल राखण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.
हे पण वाचा
- अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल
- आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.
- आजचे राशी भविष्य शनिवार दि.१५ मार्च २०२५
- पत्नीला सर्व सुखसुविधा मिळाव्यात म्हणून पती कामानिमित्त घराबाहेर, प्रियकर पत्नी जवळ घरी, एक दिवस डाव साधला अन् केला मोठा कांड!
- ३६ वर्षीय महिलेचे १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर प्रेम जडले अन् एके दिवशी त्यास फूस लावून पळवून नेले; चार महिन्यानंतर एका पोस्टने पितळ पडले उघडे.