जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांचेकडून विकास कामांची पाहणी.

Spread the love

एरंडोल :- शहरात शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुरु असलेल्या विविध विकासकामांची जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी पदाधिका-यांसह
पाहणी केली.पालिकेतर्फे सुरु असलेल्या विकासकामांच्या कामांबद्दल समाधान व्यक्त करून सर्व कामे लवकर पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी राज्यात सर्वत्र चर्चेत असलेल्या आणि पहिलाच असलेल्या ‘पुस्तकांचा बगीचा’ आणि विपश्यना केंद्रासह
शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.

शहरात सुरु असलेल्या विकास कामांबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली.पुस्तकांचा बगीचा उभारून
पालिकेने नवा आदर्श उभा केल्याचे प्रतिपादन उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले.पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून निसर्गरम्य
वातावरणात आनंदनगर मध्ये उभारण्यात येणा-या पुस्तकांच्या बागीचामुळे शहराच्या सौदर्यात भर पडणार असल्याचे सांगून पालिकेच्या कार्याची प्रशंसा केली.

पुस्तकांच्या बगीच्यात उभारण्यात आलेल्या सेल्फी pont मध्ये उपस्थित मान्यवरांनी छायाचित्र काढून आनंद घेतला.शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील नवीन वसाहतींमधील खुल्या भूखंडांवर सार्वजनिक उद्यानांची उभारणी करून सुशोभिकरण करण्यात येत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने शहरातील अशाच वेगळ्या उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून शहराची
राज्यात वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गालगत सुरु असलेल्या विपश्यना केंद्र व संविधान सभागृहाच्या सुरु असलेल्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,दिलीप पाटील, अंतुर्लीचे माजी उपसरपंच गौरव पाटील,गोविंदा राठोड यांचेसह पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार