जामखेड :- तालुक्यात अनेक ठिकाणी एकाच घरात भाऊ व बहिण यांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी आढळून आली आहे. यात बहिणीची कुणबी तर भावाची मराठा नोंद आहे. यामुळे मराठा म्हणजे कुणबी असल्याचाच हा पुरावा आहे.शासनाने मराठा समाजाला कुणबी आरक्षण ताबडतोब द्यावे अशी मागणी होत आहे.मराठा आणि कुणबींमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे उघड होत आहे.
जामखेड तालुक्यात मोरे कुटुंबात बहिण कुणबी तर भाऊ मराठा अशी नोंद शाळेच्या दाखवल्यावर आहे. चंद्रभागा भाऊ मोरे हिंदू कुणबी तर दिगंबर भाऊ मोरे हिंदू मराठा अशी शाळेच्या दाखवल्यावर नोंद आहे. यामुळे मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी होत आहे.सख्खे भाऊ बहिण असुनही दाखवल्यावर वेगवेगळी नोंद आहे. अजूनही अनेक जणांची अशीच नोंद निघत आहे.

राज्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. काहींच्या नोंदी कुणबी तर काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहेत. मात्र जामखेड तालुक्या अनेक ठिकाणी एकाच घरात वेगवेगळ्या नोंदी आहेत. तसेच राज्यात पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्रे व्हायरल झाल्याने प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. जामखेड तालुक्यातील साकत गावात 1920 पर्यंत अनेक दाखल्यांवर कुणबी नोंद आहेत 1920 नंतर मात्र मराठा नोंद लागल्या आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






