लखनऊ :- भदोहीच्या ज्ञानपूरचे माजी आमदार आणि बाहुबली विजय मिश्रा यांना एमपी/एमएलए कोर्टाने सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात १५ वर्षाच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच कोर्टाने त्यांना एक लाख दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कोर्टाने शुक्रवारी विजय मिश्रा यांचा मुलगा आणि नातू यांना पुराव्याअभावी दोषमुक्त केलं होतं.
विजय मिश्रा हे बाहुबली म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एका महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यात महिलेने आरोप केला होता की, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी कोर्टाने विजय मिश्रा यांना १५ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
काय? आहे प्रकरण
वाराणसीमध्ये राहणाऱ्या एका गायिकेने २०२० मध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. बाहुबली आणि ज्ञानपूरचे माजी आमदार वियज मिश्रा, त्यांचे पुत्र विष्णु मिश्रा आणि त्यांचे नातू विकास मिश्रा यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. महिलेने आरोप केलाय की, निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कारच्या घटनेनंतर तक्रार का दाखल केली नाही, यावर उत्तर देताना महिलेने म्हटलं की, त्यावेळी विजय मिश्रा यांचा दबदबा खूप होता.

त्यांची राजकीय ताकद जास्त होती. त्यामुळे ती पोलिसांकडे जाऊ शकली नाही. सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजय मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबियांवर कारवाईला सुरुवात केली असल्याने महिलेने पुढे येऊन तक्रार दाखल केली आहे.न्यायमूर्ती सुबोध सिंग यांनी शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी घेतली. त्यांनी माजी आमदार विजय मिश्रा यांना दोषी ठरवलं. तसेच त्यांचे पुत्र आणि नातू यांना निर्दोष ठरवलं. पीडितेची बाजू मांडणाऱ्या वकीलांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. एमपी/एमएमए कोर्टाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर विजय मिश्रा यांना दोषी ठरवलं आणि शिक्षा दिली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






