पैठण :- एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कारकीन येथे पती-पत्नीच्या झालेल्या वादातून पतीने पत्नीचा खून केला. ही घटना आज (दि.३) दुपारी घडली. खून करून पळून जात असताना आरोपी पतीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारकीन येथील आतिष रावसाहेब ताकवले (वय २५) याचा आपल्या पत्नी सोनाली आतिष ताकवले (वय २२) हिच्यासोबत आज दुपारी वाद झाला.
या वादातून पती आतिष ताकवले यांनी आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने गळ्यावर व पोटावर तीन ते चार वार केल्यामुळे पत्नी सोनाली रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच तो पळून जाऊन लागला. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे जमादार राजेश चव्हाण यांनी या आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सपोनि निलेश खेळे, जमादार करतासिंग सिंगल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत. मृत महिलेला एक मुलगी असून तिचे माहेर सावखेडा (ता. गंगापूर) येथील आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






