लखनौ (उत्तर प्रदेश): नवविवाहितेने हनिमूनच्या रात्री पतीला नशेच्या गोळ्या दिल्यानंतर नवरा आणि सासरची मंडळी झोपली असल्याचे पाहून तिने मामासोबत पळ काढला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.सकाळी जेव्हा तिच्या नवऱ्याला जाग आली तेव्हा पत्नी घरी न दिसल्याने त्याला धक्का बसला. शिवाय, झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने नवरदेवाला चक्कर येत होती.
कुटुंबियांनी केलेल्या तपासावेळी समजले की, ती तिच्या मामासोबत पळून गेली आहे. दरम्यान, पीडित नवरदेवाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पीडित युवकाने सांगितले की, ‘खुटार पोलीस स्टेशन हद्दीतील गावात राहणाऱ्या युवतीसोबत लग्न झाले होते. रात्री पत्नीने त्याला झोपेच्या गोळ्या दिल्यामुळे गाढ झोप लागली. घरात ठेवलेले 50 हजार रुपये घेऊन पत्नी मामासोबत पळून गेली. सकाळी उठल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

डोळे उघडल्यावर त्याला चक्कर येत होती. त्याला बेडवर झोपेच्या गोळ्या पडलेल्या आढळल्या. या घटनेची तक्रार सासरच्या मंडळींकडे केली आहे. सासरच्यांनी दोन-चार दिवसांत मुलीला घेऊन येऊ असे सांगितले.’दरम्यान, नवविवाहितेने पळून जाताना चोरीही केली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस पुढील तपास करत आहेत. संबंधित घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






