अमळनेर l प्रतिनिधी :- लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस घरातून पळवून नेऊन तिच्यासोबत शारीरिक सबंध करणाऱ्या एका तरुणास अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी अविनाश सुरेश धनगर वय २२ रा.भावेर ता.शिरपूर जि.धुळे याने १५ डिसेंबर २०२१ रोजी चहार्डी ता.चोपडा येथून एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते.याबाबत वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा पोलीस स्टेशन ला अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे व पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत यांनी २२ डिसेंबर २०२१ रोजी आरोपी व पीडित मुलीला ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले होते.आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीस रोहिणी भोईटी ता. शिरपूर, मानपूर,सुंद्रेल व ओंकारेश्वर या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले.त्यामुळे आरोपीविरुद्ध कोर्टात दोषारोप दाखल करण्यात आले होते.

सदर खटल्यात न्यायालयाने १८ साक्षीदार तपासले त्यात पीडित अल्पवयीन मुलगी,ज्या ठिकाणी नेले तेथील साक्षीदार,वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वैद्यकीय अहवाल,व जन्माच्या नोंदी वरून अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले.तसेच आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक संबंध केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश २ पी आर चौधरी यांनी आरोपीस भादवी कलम ३६३ ए प्रमाणे ५ वर्ष व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ कलम ४ नुसार १० वर्ष शिक्षा सुनावण्यात आली.

सदर खटल्याचा सरकारी वकील बी आर चौधरी यांनी युक्तिवाद केला तर पैरवी अधिकारी उदयसिंग साळुंखे,पोलीस हेड कॉन्स्टेबल हिरालाल पाटील,पोलीस कॉन्स्टेबल नितीन कापडणे,राहुल रणधीर,अतुल पाटील यांनी काम पाहिले.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






