कर्जत : बदलापूरमधील 45 वर्षांच्या व्यक्तीने कर्जत हद्दीत रेल्वेखाली येऊन जीवन संपवल्याची घटना घडली होती, या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे.रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तपास सुरू केला असता ही व्यक्ती बदलापूरमधील रिक्षाचालक असल्याचं समोर आलं. या व्यक्तीवर बदलापूर पोलीस ठाण्यात आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता, त्यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार पत्नीच्या जबाबावरून मयत व्यक्तीचं आधी एक लग्न झालं होतं, त्यापासून त्याला एक मुलगा होता, मात्र त्याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. घटनेची फिर्यादी आणि दुसऱ्या पत्नीपासून त्याला दोन मुलं आहेत, यात पाच वर्षांचा मुलगा आणि 10 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
इकडे कोणतंही काम नसल्यामुळे नातेवाईकांनी पत्नीला दुबईला कामासाठी यायला सांगितलं. नवऱ्याचं शिक्षण नसल्यामुळे त्याला तिथे नोकरी मिळू शकली नाही, तर पत्नी पदवीधर आणि डिप्लोमा केलेली असल्यामुळे तिला तिथे नोकरी मिळाली. त्यामुळे ती दोन्ही मुलांना नवऱ्याकडे सोडून दीड वर्षांपासून दुबईला काम करत होती.

पाच दिवसांपूर्वी तिने मुलांना फोन करून विचारणा केली असता 10 वर्षांच्या मुलीने आईला तिच्यासोबत होत असलेल्या कृत्याची कल्पना दिली. यानंतर आईने तात्काळ दुबई सोडले आणि बदलापूर गाठलं. घरी येताच नवरा घरात नसल्यामुळे मुलीला सोबत घेऊन ती बदलापूर पोलीस स्टेशनला पोहोचली आणि नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता तिने सगळा घटनाक्रम सांगितला. यानंतर पोलिसांनी तात्काळ वडिलांविरोधात पोक्सो अंतर्गत 376 प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

याप्रकरणाची माहिती मिळताच मयत रिक्षाचालकाने मोबाईलवरून एक व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ त्याने आपल्या भावाला आणि इतर नातेवाईकांना पाठवला. पत्नी आणि तिचे नातेवाईक आपल्याला नाहक बदनाम करत असल्याचा आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप त्याने केला. मुलीला खोटं सांगून मला गुंतवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्याने या व्हिडिओमध्ये केला.
हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवल्यानंतर त्याने रेल्वेखाली जायचा निर्णय घेतला. मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याचं कळताच मयत व्यक्तीच्या आईने पोलीस ठाण्यात सून आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल केली. मुलीचं मेडिकल प्रमाणपत्र पोलिसांना मिळालं असून यात मुलीसोबत शारिरिक अंगलट झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यानंतर आता पुढचा तपास पोलीस करत आहेत.
हे पण पहा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






