सातारा : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. यासोबतच आर्थिक फसवणुकीचेही प्रकार सातत्याने समोर येत आहेत.त्यातच आता सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या पत्नीची हत्या केल्याच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं –
चारित्र्याच्या संशयावरुन एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे ही घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने दारुच्या नशेत पत्नीचे डोके भिंतीवर आपटून पत्नीचा खून केला. रविवारी ही घटना समोर आली. दिपाली धोंडीराम पुकळे (वय-29) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर धोंडीराम पुकळे (वय-40, रा. पुकळेवाडी, ता. माण) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दिपाली आणि धोंडीराम यांना 9 आणि 8 वर्षांची दोन मुले आहेत. डीराम आणि पत्नी दीपाली हे म्हसवड येथील सहकारनगर परिसरात कवी वस्तीनजीक एका बिल्डिंगमध्ये भाडोत्री राहत होते. दिपाली ही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. शनिवारी रात्री दारू पिऊन आला. यानंतर यावेळी पती पत्नीमध्ये भांडण झाले. या भांडणात त्याने आपल्या पत्नी दिपालीचे डोके भिंतीवर आपटले. यात तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा
- मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दोघांना डंपरची जोरदार धडक,दुचाकीस्वार तरुण ठार तर मित्र गंभीर जखमी.
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.