Viral Video: दिवाळी आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. तुमच्याही घरात दिवाळीची तयारी सुरु झाली असेल, फराळ, शॉपिंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साफ-सफाई. दिवाळी म्हंटलं की आधी साफ-सफाई आलीच. मग त्यात रंगकामही. दिवाळी बहुतेक सगळ्यांच्याच घरी रंगकाम केलं जातं. मात्र यावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल मध्येच काळजी घ्यायला का सांगताय. तर त्याचं झालं असं की एक व्यक्ती असंच घराचं रंगकाम करण्यासाठी शिडीवर चढला होता,मात्र तोल जाऊन त्याचा मोठा अपघात झाला आहे.
याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल..या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घराला बाहेरच्या बाजुला रंग देण्यासाठी एका शिडीनप व्यक्ती उभा आहे. खाली आणखी एक व्यक्ती शिडीला पकडून उभा आहे. सगळं नीट सुरु असताना अचानक खालचा व्यक्ती शिडी दुसऱ्या बाजूला हलवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच गडबड होते. शिडीवर उभा असलेला व्यक्ती तोल न सांभाळता आल्यामुळे आणि शिडी पडल्यामुळे खाली पडतो.

तो इतक्या जोरात पडतो की त्याला पुन्हा उठताही येत नाहीये. हा असा अचानक अपघात कोणाबरोबरही होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही जर दिवाळीनिमित्त तुम्हीही घराला रंग देणार असाल तर काळजी घ्या.सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @CctvPicks या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.
पाहा व्हिडीओ.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






