शहापूर :- तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून कसारा घाटत वाहनांना अडवून लुटण्याचे प्रकार समोर येत होते.
अखेर या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून टोळीतील दोघांना कसारा पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन चार दिवसांपासून नवीन व जुन्या कसारा घाटात वाहनांना लुटण्याचे प्रकार समोर येत होते.
या टोळीकडून घाटातील गाड्या अडवून तसेच रात्रीच्या वेळी वाहनांवर दगडफेक करत चाकू व पिस्तूलाचा धाक दाखवून चालकांकडून पैसे व गाडीतील सामान चोरी करून पसार होत होते. आज पहाटे (गुरूवार, ९ नोव्हेंबर) जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्यावर एक वाहन बंद पडले होते. याचाच फायदा घेत चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे व वाहनातील सामान घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी गाडी चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढून पोलिसांत तक्रार दाखल केली.

याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस जुन्या कसारा घाटात दाखल झाले मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.पोलीस घाटात असतानाच नवीन कसारा घाटात वाहनांवर दगड फेकून अडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपला मोर्चा नवीन कसारा घाटत वळवला व मोठ्या शिताफीने रोहन सुनिल सोनवणे (रा. इगतपुरी तळेगाव) महेश लहानू बिन्नर (रा. लतीफवाडी, शहापूर) यांना जेरबंद केले आहे.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






