यावल : तालुक्यातील मनवेल येथील २२ वर्षीय गरोदर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले मयत व तिच्या पोटातील बाळ देखील दगावले आहे तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनवेल ता. यावल येथील रहिवाशी शितल उर्फ रूपाली विजय कोळी वय २२ वर्षीय गरोदर महिला आपल्या घरी होती. दरम्यान घरात तिने छताच्या आडव्या लोखंडी एंगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला. सदर प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तीला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले

सदर महिला गरोदर होती तिच्या पोटात पुरुष जातीचे अभ्रक होते ते देखील यात दगावले आहे. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भगवान कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






