विरोधकांनी विकासावर बोला, अभ्यासाविना व माहिती विना केलेले आरोप हे त्यांचेच हसू करीत आहेत, विकास कामांच्या गंगेत येणाऱ्या काळात विरोधक हे वाहून जातील. पारोळा l प्रतिनिधी
एरंडोल विधानसभा मतदारसंघातील सात मंडळांचा दुष्काळ सदृश्य परिस्थितीत समावेश करण्यात आलेला आहे. उर्वरित राहिलेल्या मंडळांचा देखील लवकरच समावेश करण्यात येईल. असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मला दिले अशी माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.
शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 8 नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील मंडळांचा दुष्काळ सदृश्य परिस्थिती समावेश करण्यात आला आहे. तरीसुद्धा विरोधक हे काल तारीख 10 रोजी मतदार संघाच्या दुष्काळ सदृश्यपरातील समावेश करण्यात यावा अशी मागणी करून जनतेची दिशाभूल करीत आहे.
मुळात विरोधकांनी सुरुवातीला माहिती घेऊन व अभ्यास करूनच आरोप करावेत. अभ्यासाविना व माहिती विना केलेले आरोप हे त्यांचेच हसू करीत असल्याचा प्रतिटोला आमदार पाटील यांनी लगावला आहे.तालुक्यात नुकत्याच झालेल्या अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आठ ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच पदी शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले आहेत. यावर आम्ही आजही ठाम आहोत. तसे विजयी छायाचित्रे आमच्याकडे आहेत.

तसेच चहुत्रे ग्रामपंचायतचे सदस्य व सरपंच हे स्वतःहून आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे आम्ही केलेला दावा हा खोटा असल्याचा विरोकांच्या आरोपात तथ्य नाही. मुळात मतदारसंघांमध्ये करोडो रुपयाचे विकास कामे सुरू आहेत. त्या विकास कामांच्या गंगेत येणाऱ्या काळात विरोधक हे वाहून जातील या भीतीपोटी ते खोटेनाटे आरोप करीत आहेत. तामसवाडी गावात 85 लाख रुपयांचा विकास निधी मी दिला आहे. त्यामुळे विरोधकांचा पोटात अधिकचा पोटशूट होत आहे. विकास कामांची टेंडर प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. तो अधिकार त्यांचा आहे. त्यात आमचा हस्तक्षेपाचा संबंध येतोच कुठे आम्ही हस्तक्षेप करत असल्याचा आरोप हा हास्यास्पद आहे.

विशेष म्हणजे उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख यांनी यापूर्वी पारोळा शहरासाठी एक कोटी रुपये आणल्याचा दावा केला होता. ते एक कोटी रुपये कुठे आहेत याचा खुलासा त्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. पारोळा शहरात आज 110 कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळातील शहरातील चार-पाच कोटी रुपयांचे विकास कामांची यादी तरी सांगावे असे आव्हान आमदार पाटील यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांना दिले आहे. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील डॉ दिनकर पाटील चतुर पाटील तालुकाप्रमुख मधुकर पाटील आदी उपस्थित होते.
हे पण वाचा
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






