विवाहितेचे इन्स्टाग्रामवर जुळले एकाशी सुत, 8 वर्षांचं लग्नच लावलं पणाला, प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा.

Spread the love

पोरबंदर :- (गुजरात ) मध्ये एका 35 वर्षांच्या युवकाच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचले. सोशल मीडियावर सुरू झालेलं हे प्रेम इतकं वाढलं की पत्नीने तिचं 8 वर्षांचं लग्नच पणाला लावलं आणि नवऱ्याचीही हत्या केली. आता महिला आणि तिचा प्रियकर जेलमध्ये आहेत.बुधवारी सकाळी एका 65 वर्षीय व्यक्तीने पोलिसांना राजूची हत्या झाल्याची माहिती दिली.

दूधवाल्याने सकाळी दूध देण्यासाठी दरवाजा वाजवला पण कुणीही दार उघडलं नाही, हे दूधवाल्याने वडिलांना सांगितलं, मग वडील भिंतीवरून उडी मारून घरात पोहोचले तेव्हा त्यांना मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.वृद्धाने मृत्यू झालेल्या राजूची पत्नी कृपाली आणि तिचा प्रियकर नितेश वेकारिया (वय 23) यांच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी दिवसभर तपास केल्यानंतर वेकारिया आणि कृपालीला अटक केली. या हत्याकांडात कृपालीचा भाऊ विशाल समानी (वय 23) याचाही समावेश असल्याचा संशय आहे, त्यामुळे त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. राजू ओडेदराचं लग्न 15 वर्षांपूर्वी नीता नावाच्या महिलेशी झालं होतं, पण दोन वर्षांमध्येच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर 8 वर्षांपूर्वी राजूने दुसरं लग्न कृपालीसोबत केलं, या दोघांचाही प्रेम विवाह होता.

इन्स्टाग्रामवर वाढलं प्रेम इन्स्टाग्रामवर वाढलं प्रेम लग्नानंतर राजू आणि कृपालीला एक मुलगीही झाली, जिचं वय आता 7 वर्ष आहे. एका वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर कृपाली आणि नितेश वेकारिया यांची भेट झाली आणि दोघं प्रेमात पडले. यानंतर कृपाली राजूसोबतचं 8 वर्षांचं नातं सोडून राजकोटला नितेशकडे राहायला गेली, तिथे नितेश ड्रायव्हर म्हणून काम करत होता. राजूच्या सांगण्यावरून कृपाली दोन महिन्यांनी घरी आली.

यानंतर पती-पत्नी त्यांचं नातं पुन्हा सामान्य करण्याचा प्रयत्न करू लागले.फक्त 15 दिवस नवऱ्यासोबत राहिल्यानंतर कृपालीने पुन्हा घर सोडलं आणि ती परत नितेशकडे राहायला गेली. राजूने तिला परत आणण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. कृपालीच्या भावानेही तिचं समर्थन केलं. नितेश आणि कृपालीचा भाऊ मंगळवारी रात्री पोरबंदरला गेले आणि त्यांनी राजूच्या घरात घुसून त्याच्यावर धारदार वस्तूने हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं.

हे पण वाचा

टीम झुंजार