तुला घरी सोडून देतो बहाण्याने घेऊन गेला स्वतःच्या घरी, अन् केले धर्मांतर तब्बल१५ महिने केला बलात्कार!वाचा धक्कादायक घटना.

Spread the love

लखनऊ : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथील एका कट्टरपंथीयाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका मुलीचे अपहरण करत तिच्यावर तब्बल १५ महिने बलात्कार केला. त्यानंतर तिचे धर्मांतरही केले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील हे प्रकरण असून अफरोज अली असे आरोपीचे नाव आहे. याविषयी तक्रार दाखल करताना पीडितेने सांगितले की, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी ती तहसील मुख्यालयाजवळील इंटर कॉलेज रोडवर उभी होती.

त्यावेळी कलकली बहरा येथील रहिवासी असलेला अफरोज अली तिथे पोहोचला. ती अफरोजला आधीपासूनच ओळखत होती.त्यानंतर त्याने तिला घरी सोडतो असे सांगत आपल्या दुचाकीवर बसवले. मला माझ्या घरी काही सामान नेऊन ठेवायचे आहे असे सांगत तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. तिथे अफरोजच्या बहिणींनी तिला काहीतरी खायला दिले. ते खाल्ल्यानंतर तिथेच बेशुद्ध पडली.

ज्यावेळी ती शुद्धीवर आली तेव्हा ती दुसऱ्या राज्यात असल्याचे तिच्या लक्षात आले. पीडितेने पुढे सांगितले की, आरोपीने अनेक महिने तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला झारखंडमधील गढवा न्यायालयात घेऊन गेला. तिथे जात असताना वाटेत त्याने तिला मौलवींच्या घरी नेत तिचे धर्मांतरही केले. तसेच तिचे नाव बदलून कायनात खातून असे केले. यानंतर अफरोजने तिच्याशी लग्न केले.

लग्नानंतर अफरोजने उर्दूमध्ये कागदपत्रे तयार करत त्याआधारे कोर्ट मॅरेजही केले.कोर्ट मॅरेजनंतर अफरोजने तिला पुन्हा सोनभद्र परिसरात आणले आणि तिथे एका खोलीत बंद करुन ठेवले. त्यानंतर तिने कसेबेसे तिच्या कुटुंबियांना आपले लोकेशन पाठवले. त्याआधारे शोध घेत पोलिसांनी तिची सुटका केली आहे. तसेच याप्रकरणी अफरोज आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार