जळगाव :- जिल्ह्यात आठवड्यातून एक तरी लाचखोरीचा प्रकार उघडकीस येत आहे. यात आता आणखी एका लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. पाच लाखांची लाच घेताना सहायक गटविकास अधिकार्यासह विस्तार अधिकार्याला आज एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. रवींद्र शालीग्राम सपकाळे ( वय ५४, सहायक गटविकास अधिकारी) व पद्माकर बुधा अहिरे ( वय ५३, विस्तार अधिकारी) असे दोघा लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव असून या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती. या चौकशीत अनुकुल असा रिपोर्ट देण्याच्या बदल्यात त्याला संबंधीत समितीचे अध्यक्ष व सदस्याने तब्बल पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. तर, संबंधीत व्यक्तीने या संदर्भात जळगावच्या अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनुसार आज पाडव्याची सुटी असतांना देखील सहायक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे ( वय ५४) आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे ( वय ५३) या पंचायत समितीतील दोन्ही अधिकार्यांनी तक्रारदाराला बोलावले होते. येथे पाच लाखांची लाच स्वीकारत असतांना या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेतले. यामुळे सुटीच्या दिवशी लाच घेणे या दोघांना महाग पडल्याचे दिसून आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






