एरंडोल:- एस टी स्टँड वर भडगाव येथे आपल्या घरी जात असलेल्या महिलेला गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची 25 ग्रॅम सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आज दिं 16 तारखेस दुपारी 1:15 वां वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की भडगाव येथील गृहिणी कल्पना दिलीप तोतले वय 60 वर्षे ह्या घरी जाण्यासाठी मानराज पार्क जळगाव येथून दुपारी बारा वाजेच्या सुमारास निघाल्या त्या दुपारी 12:45 वाजता एरंडोल बस स्थानकावर उतरल्या तेथून भडगाव जाण्यासाठी 1:15 वाजता चाळीसगाव मार्गे नाशिक आली त्या गाडीत चढणाऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होती
या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी कल्पना बाई तोतले यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याची सुमारे दीड लाख रुपये किमतीची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. कल्पनाबाई तोतले यांनी एसटीत बसल्यानंतर गळ्यात हात लावले असता त्यांना सोन्याची पोत मिळून आली नाही म्हणून आरोडारोड केली आजूबाजूच्या सर्व प्रवाशांना विचारपूस केली परंतु सोन्याची पोत मिळून आली नाही म्हणून एरंडोल पोलीस स्थानकात कल्पनाबाई तोतले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात माधवी 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे मार्गदर्शनाखाली हवालदार विलास पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
सध्या दीपावली भाऊबीज चा सण असल्यामुळे मध्ये एसटी स्टँड मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हे महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत, नागरिकांच्या खिशातील पाकीट, मोबाईल चोरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी सतर्क रहावे
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






