11वर्षांच्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर मुख्याध्यापक व शिक्षक या दोघ नराधमांनी केला सामूहिक बलात्कार.

Spread the love

ओडिशा :- एका 11 वर्षांच्या आदिवासी मुलीवर दोन शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ओडिशात उघड झाली आहे. गंभीर म्हणजे, ज्या सरकारी शाळेत ही मुलगी शिकते, त्याच शाळेच्या शौचालयात तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीला आली.

मुलीला ओटीपोटात दुखू लागल्याने तिने कुटुंबीयांना सांगितलं. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथे तिची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं.तिने केलेल्या तक्रारीनुसार, ती शौचालयात गेलेली असताना शाळेचा मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी शौचालयात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर त्या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सध्या या दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली असून पीडित विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार