जोधपूर (राजस्थान):- पोलिसांनी दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटा पाचशे रुपयांच्या आहेत. त्या सर्व नोटा एकाच सीरिजच्या असल्याचं सांगितलं जात आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या बनावट नोटा कारमधून नेल्या जात होत्या. दरम्यान, पोलिसांनी या संदर्भात एका व्यक्तीला अटक केली आहे. तसंच, दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह एक कार जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरमधल्या शास्त्रीनगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात एका कारमध्ये सुमारे दोन कोटी रुपये मूल्याच्या बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांना या संदर्भात खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्या आधारे शुक्रवारी (10 नोव्हेंबर) पोलिसांनी ही कारवाई केली. या साऱ्या नोटा बनावट असून, एकाच सीरिजच्या असल्याचं प्राथमिक तपासात आढळलं आहे. पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या बातमीत तथ्य होतं, हे आता या कारवाईनंतर स्पष्ट झालं आहे. प्राथमिक पातळीवर पोलिसांनी या संदर्भात कारवाईला सुरुवात केली असून,
या बनावट नोटा घेऊन जाणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. तो तरुण मूळचा नागौर जिल्ह्याचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. कार आणि कॅशसह सापडलेला आरोपी हनवंत याचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात आणखीही अनेक जण गुंतलेले असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांनाही ताब्यात घेतलं जात आहे. या बनावट नोटा कुठून आल्या आणि कुठे नेल्या जात होत्या, याचाही तपास केला जात आहे.अटक करण्यात आलेल्या हनवंत नावाच्या युवकाच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर, तसंच संशयाच्या आधारावर काही जणांना पकडण्यात आलं आहे.
एडीसीपी यांच्या नेतृत्वाखाली एसीपी वेस्ट आणि पाच-सहा पोलीस ठाण्यांचे एसएचओ करत आहेत. त्यांच्यासोबत डीएसटीही आहेत, जेणेकरून तपास अधिक व्यापक होऊ शकेल. या बनावट नोटा कुठे तयार झाल्या, त्या कुठे नेल्या जात होत्या, त्यांचा वापर कसा आणि कुठे केला जाणार होता, त्यामागचा नेमका उद्देश काय होता, याची माहिती तपासानंतरच उघड होणार आहे.
हे पण वाचा
- Viral Video:बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहात;अन् भररस्त्यात केली दोघांची धो धो धुलाई पहा व्हिडिओ.
- ‘तो तिच्यावर करत होता जीवापाड प्रेम’ पण ‘ती’…… आयुर्वेदिक औषधात विष मिसळून प्रियकराची केली हत्या; प्रेयसीला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
- चोपडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई.
- “तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील; आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न.
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.