एरंडोल :- घराचा मागचा दरवाजा तोडून अडीच लाख रुपये रोख आणि २ लाख ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना गांधीपुरा
भागातील कागदीपुरा येथे घडली.गांधीपुरा सारख्या दाटवस्तीत चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. याबाबत माहिती अशी,की गांधीपुरा भागातील कागदीपुरा येथील किराणा दुकानदार खालिद अहमद रफिक अहमद हे १५ नोव्हेंबर रोजी अमरावती येथे नातेवाईकांकडे विवाह असल्यामुळे परिवारासह गेले होते.खालिद अहमद हे १७ नोव्हेंबरला रात्री सात वाजेच्या सुमारास अमरावती येथील विवाह कार्यक्रम आटोपून घरी आले त्यावेळी घराच्या पुढच्या दरवाजाचे कुलूप लावले होते.
खालिद अहमद हे परिवारासह घराचा दरवाजा उघडून आत गेले असता त्यांना घराचा मागचा दरवाजा तुटलेला दिसला. तसेच मागच्या दरवाजास छिद्र पाडल्याचे दिसून आले.खालिद अहमद व त्यांच्या पत्नीने दिवाणमध्ये असलेल्या पर्सची पाहणी केली असता त्यांना लाकडी कपाटामध्ये पर्समध्ये असलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने आढळून आले नाही.तसेच घराच्या पुढच्या बाजूस असलेल्या किराणा दुकानामध्ये असलेली रोख रक्कम देखील नसल्याचे दिसून आले.अज्ञात चोरट्याने खालिद अहमद यांच्या घरातून २ लाख ५० हजार रुपये रोख तसेच सुमारे ७६ gram वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते.

तसेच घराच्या मागच्या दरवाजास मोठे छिद्र पाडून त्यामध्ये हाताचा पंजा घालून आतील कडी उघडली होती.याबाबत खालिद अहमद यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहेत.जळगाव येथून श्वान पथक घटनास्थळी आले असता ते परिसरातच घुटमळत
राहिले.कागदीपुरा सारख्या दाट वस्तीमध्ये सुमारे पाच लाख रुपयांची चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






