यावल : शहरातील विस्तारित भागातील विरार नगर मधील माहेर असलेल्या २६ वर्षीय विवाहितेचा घर बांधण्यासाठी माहेेरहून एक लाख रुपये आणावे याकरिता पतीसह सात जणांनी तिचा छळ केला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरात विस्तारित भागात विरार नगर आहे. या विरार नगरातील माहेर असलेल्या शबनम रमजान तडवी वय २६ या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह मार्च २०१८ मध्ये रमजान हुसेन तडवी राहणार बोरखेडा, हल्ली मुक्काम हरी ओम नगर, यावल यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर विवाहितेचा पती रमजान तडवी, आबेदा तडवी, हुसेन तडवी, नजीर तडवी, मीना तडवी, सायबु तडवी, शमशाद तडवी या सात जणांनी
घर बांधण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, व पैसे आणले नाही तर तुला नांदवणार नाही असे सांगत तिचा छळ केला आणि माहेरी सोडून दिले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






