एरंडोल :- येथील पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने पांडव वाड्याजवळ हनुमान मंदिरासमोर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे ५ हजार शंभर पणती मधील दिव्यांच्या माध्यमातून आयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. दीपोत्सव कार्यक्रमास उपस्थित हजारो महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रभू रामचंद्र की जय यासह विविध घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता. येथील पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने पांडववाडा परिसरात असलेल्या हनुमान मंदिरासमोर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरती कार्यक्रमास हजारो भाविक उपस्थित राहत असतात. यावर्षी संस्थेच्यावतीने दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
५१०० दिव्यातून साकारली आयोध्येतील प्रतिकृती
संस्थेचे पदाधिकारी व महिलांनी मंदिरासमोर सुमारे ५ हजार १०० दिव्यांच्या माध्यमातून आयोध्या येथील श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती साकारली होती. मंदिर परिसरात सर्वत्र आकर्षक रांगोळ्या काढून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आयोध्येतील कारसेवेत सहभागी कारसेवकांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले. कारसेवेत सहभागी झालेले माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी कारसेवेतील अनुभव सांगितले. अॅड. राहुल पारेख, संजय महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
२ डिसेंबर रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन
२ डिसेंबर रोजी कासोदा दरवाजा पासून भव्य मिरवणूक काढून नथ्थू बापूंना भगवी चादर चढवण्यात येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी व्हावे. असे आवाहन पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कुणाल महाजन यांनी सांगितले, कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, दशरथ महाजन, राजेंद्र चौधरी, डॉ. संभाजी पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, भाजपचे चिटणीस अमोल जाधव, धनश्री
इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राहुल तिवारी, डॉ. नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर.डी.पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस निलेश परदेशी, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राजा भेलसेकर व नागरिक हजर होते.

हनुमान चालिसाने भक्तिमय वातावरण
यावेळी महिला, युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. शहरातील शेकडो महिला आणि स्वयंसेवकांनी परिसरात आकर्षक रांगोळ्या काढून वातावरण भक्तिमय केले होते. यावेळी विविध देव देवतांच्या आरत्या व हनुमान चालिसा पटण करण्यात आली, भाविकांनी विविध घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता
यांनी घेतले परिश्रम
पांडव नगरी बहुउद्देशीय संस्थेचे कुणाल महाजन, भूषण चौधरी, वसंत पवार, नितीन बोरसे, भावेश तिवारी, मयूर बिर्ला, सत्यम परदेशी, मयूर महाजन, कुणाल पाटील, भूषण सोनार, शेखर ठाकूर, विवेक ठाकूर, संजय पाटील, रोहिदास महाजन, योगेश पल्लीवाड, सागर महाजन, सुशील परदेशी, दिनेश महाजन, लालू दुबे, लकी महाले, मुन्ना महाले, प्रीतेश परदेशी, मोहित परदेशी, वैभव पाटील, गणेश वाणी, करण पाटील, नीतेश चौधरी, राज पाटील, ऋषी वाणी, बलराम परदेशी, पवन चौधरी, शरद महाजन, कल्पेश साळी, तुषार सोनार, उमेश साळी, चिंटू साळी, केवल ठक्कर, प्रशांत चौधरी, विनायक मोरे, राहुल लोहार, यश साळी, सतीश पहिलवान, ज्ञानेश्वर वाणी यांनी सहकार्य केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






