लखनऊ :- दिवाळीच्या रात्री उत्तर प्रदेशच्या राजधानीचं शहर असलेल्या लखनऊमध्ये एका पोलीस इन्स्पेक्टरची गोळ्या झाडून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. अंधाराचा फायदा घेऊन मारेकऱ्यांनी इन्स्पेक्टरला मानेत दोन आणि पाठीवर दोन गोळ्या मारल्या होत्या. सतीश सिंह असं नाव असलेल्या या पोलीस इन्स्पेक्टरच्या हत्येचा तपास करत असताना अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या हत्येमागे सेक्स अँगल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिवाळीची रात्र लखनऊमधले पीएसी इन्स्पेक्टर सतीश सिंह यांच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली. सतीश सिंह पत्नी आणि मुलीसह आपल्या बहिणीच्या घरून आपल्या स्वत:च्या घरी परतत होते.
घरी आल्यानंतर सतीश सिंह गेटचं दार उघडण्यासाठी कारमधून खाली उतरले होते; पण काही वेळातच त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबाराचा आवाज येताच कारमध्ये झोपलेली मुलगी व पत्नी दोघी जाग्या झाल्या आणि त्यांनी सतीश यांच्याकडे धाव घेतली. तोपर्यंत सतीश जखमी होऊन खाली पडले होते.सतीश यांच्या पत्नीने एका व्यक्तीला घटनास्थळावरून पळून जाताना बघितलं. ती व्यक्ती कोण होती हे त्यांना ओळखता आलं नाही. अंधारात त्यांना फक्त एक आकृती दिसली. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. यूपीमध्ये दिवाळीच्या दिवशी एका इन्स्पेक्टरची हत्या झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी विविध शक्यता पडताळून बघत या प्रकरणाचा तपास सुरू केला. दिवाळीच्या रात्री मारेकर्यानं अंधाराचा शस्त्र म्हणून कसा वापर केला, हे कोडं पोलिसांना उलगडत नव्हतं, ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या इन्स्पेक्टरच्या हत्येत वेश्याव्यवसायाचा संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. पत्नीनेच सतीश सिंहचे अनेक मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासा केला आहे. सतीश सिंहच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की, तो अनेक मुलींसोबत रात्री घालवत असे. अनेकदा तो वेश्यांना घरीदेखील आणत होता. सतीशच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, त्याला अनेक मुलींशी संबंध ठेवण्याची सवय होती. विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनाही याबाबत कल्पना होती.सतीश सिंहच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीने वडिलांना घरात वेश्या आणताना पाहिलं होतं. याची माहिती मिळताच पत्नीने पतीला जाब विचारला; मात्र तो संतापला आणि घरात भांडणं सुरू झाली. सतीशचे वेश्यांशी असलेले संबंध हे हत्येचं एक कारण असू शकतं, असा अंदाज पत्नीनं व्यक्त केला आहे.
आता पोलीस या अँगलने तपास करत आहेत. सतीश सिंहचे कोणकोणत्या महिलांशी संबंध होते याचा शोध घेतला जात आहे. इन्स्पेक्टरचा खून सेक्समुळे झाला की त्यामागे आणखी काही कारण आहे, या प्रश्नासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. घटना घडली त्या रात्री त्याच्या पत्नीला खुन्याचा चेहरा का दिसला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, सतीश सिंहचं घर पूर्णपणे निवासी परिसरात असून, जवळपास इतर अनेक घरं आहेत. दिवाळीच्या रात्री स्वत:चा चेहरा दडवणं खुन्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. असं असतानाही हत्येसाठी दिवाळीचीच रात्र का निवडण्यात आली? सतीश आणि त्याचं कुटुंब नेमक्या त्याच वेळी घरी येणार आहेत हे खुन्याला कसं कळलं? मारेकऱ्याला सतीश सिंहची माहिती कोणी दिली, अशा सर्व प्रश्नांचा विचार करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






