रावेर :- तालुक्यातील निंबोल शेत शिवारात एका तरुणाची डोक्यामध्ये दगड टाकून हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शेख अफजल शेख असलम उर्फ कालू (वय २७, रा. ऐनपुर, ता. रावेर) असं मृत तरुणाचं नाव असून त्याच्या हत्येमागे नेमका कोण व किती जण आहे हे सध्या सामोर आले नाही. याबाबत निंभोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेमकी घटना काय?ऐनपूर (ता. रावेर) येथील मयत शेख अफजल शेख असलम हा १४ नोव्हेम्बरला दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतात जात असल्याचे सांगून घरून निघाला.
शेतात जात असताना त्याने मित्राची दुचाकी नेली होती. परंतु तो घरी परतला नसल्याने वडीलांनी त्याला फोन केला. मात्र कोणताच प्रदिसाद मिळत नसल्याने वडीलांनी छोट्या भावाकडे फोन करून विचारणा केली.लहान भाऊ शेख फारुक हा त्याच्या शोधात शेताकडे गेला असता अफजलचा मृतदेह आढळून आला. मात्र दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास त्याची ऐनपूर- निंबोल दरम्यान निंबोल शिवारात गायरान जमिनीच्या रस्त्यांवर त्याचा मृतदेह आढळून आला.
ज्या रस्त्यांवर मृतदेह आढळला त्या रस्त्यांवरच त्याचे शेतही आहे. त्याचा खुन झाला तेव्हा त्याचे संपूर्ण कुटूंब हे द्वारदर्शनावर मलकापुर येथे गेले होते. मृतदेहाजवळ एका भलामोठा दगड आढळून आला आहे. त्याच्या हत्येमागे नेमका कोण व किती जण आहे हे सध्या सामोर आले नाही. या खुनाच्या घटनेमुळे परीसर हादरला आहे. स्वान पथक दाखल होत पंचनामा करत पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






