बरेली :- दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजा केली जाते. घरातील स्त्री ही लक्ष्मीचं रुप असते. अशातच दारूच्या नशेत पतीने पत्नीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातल तिला गंभीर जखमी केलं आहे.पीडित पत्नीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
काय घडलं दिवाळीच्या रात्री?
पीडित पत्नीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, 5 वर्षांपूर्वी आपल्या मुलीचं लग्न त्यांनी जवळच्या गावात केलं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच जावई आणि सासरच्यांनी हुंड्यासाठी मुलीचा छळ सुरू केला. या सगळ्या छळामध्ये दिवस पुढे जात होते. त्यात मुलीने दोन मुलींना जन्म दिल्या. त्यानंतर त्यांच्या अत्याचारात अधिक वाढ झाली. जावयाने मुलीला माहेरी आणून सोडलं.
या प्रकरणात आम्ही अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारही केली. दिवाळीच्या पाच दिवसांपूर्वी जावई दुसऱ्या शहरातून मजुरीचं काम करुन घरी परतल्यानंतर त्याने पत्नी आणि मुलींना घरी बोलावून घेतलं.पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे रविवारी जावयाने दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण केली. कारण तर आई वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये. मुलीने विरोध केल्यावर त्याच्या क्रूरतेची हद्दच केली. या राक्षसाने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली. पतीच्या या क्रूरतेमुळे पत्नीच्या गुप्तांगातून रक्त वाहू लागलं आणि ती वेदनेने किंचाळली. नंतर ती बेशुद्ध पडली. महिलेचा आरडाओरडा ऐकून घरातील आणि परिसरातील लोक जमा झाले. शेजाऱ्यांच्यांनी हस्तक्षेप करुन महिला वाचवलं आणि आणि भामोरा सीएचसीमध्ये घेऊन गेले. तिच्या पालकांकडे या घटनेची माहिती देण्यात आली.
कुठलीही आहे ही घटना?
त्यानंतर डॉक्टरांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आहे. महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान एसपी देहाट मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






