एरंडोल :- तालुक्यातील विखरण-रिंगणगाव गटात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तसेच आमदार निधीतील मंजूर व पूर्ण झालेल्या विविध
विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार चिमणराव पाटील व स्थानिक पदाधिका-यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२४) करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.विखरण रिंगणगाव गटातील अठरा गावात सुमारे ४६ कोटी २२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या विकासकामांचे उदघाटन यावेळी करण्यात येणार आहे.
विखरण-रिंगणगाव गटातील अठरा गावात रस्ते, सभामंडप,गटारी,व्यायामशाळा,सामाजिक सभागृह यासारख्या कामांचे भूमिपूजन व उदघाटन करण्यात येणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.तालुक्यातील विखरण-रिंगणगाव गटातील टाकरखेडा,वैजनाथ,कढोली,खेडी खुर्द, दापोरी, रवंजे खुर्द,रवंजे बुद्रुक,श्रीक्षेत्र सुकेश्वर देवस्थान,खर्ची खुर्द, रिंगणगाव,पिंपळकोठा प्र.चा.,सावदा विखरण, उमरदे, वरखेडी,पिंपळकोठा खुर्द,पिंपळकोठा बुद्रुक,पिंप्री
बुद्रुक,पिंप्री प्र.चा.,जवखेडे,टोळी या अठरा गावात शासनाच्या विविध योजना आणि आमदारांच्या स्थानिक विकासनिधीतून सुमारे ४६ कोटी २२ लाख रुपये
खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे उदघाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या विकासकामांमध्ये रस्ते,सभामंडप,एल.ई.डी.गटार बांधकाम,सामाजिक सभागृह,सभामंडप,गावातील अंतर्गत रस्ते यासह विविध कामांचा समावेश आहे असे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.गटातील रस्त्यांची कामे होणार असल्यामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील,मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्यामुळे मतदार संघातील विकास कामांसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला असून मतदार संघातील विकासगंगा आगामी काळात देखील अशीच वेगाने सुरु राहील असा विश्वास उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार चिमणराव पाटील यांनी मतदार संघातील विकासकामांचे नियोजन केले असून कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.एरंडोल शहरातील आनंदनगर मधील पुस्तकांचा बगीचा या उपक्रमाची राज्यभरातून दाखल घेण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळे आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी वीस लाख रुपये मंजूर झाले असून या तीनही कामांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे सांगितले.विखरण-रिंगणगाव गटात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास ग्रामस्थ,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले आहे.
हे पण वाचा
- Viral Video:बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहात;अन् भररस्त्यात केली दोघांची धो धो धुलाई पहा व्हिडिओ.
- ‘तो तिच्यावर करत होता जीवापाड प्रेम’ पण ‘ती’…… आयुर्वेदिक औषधात विष मिसळून प्रियकराची केली हत्या; प्रेयसीला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
- चोपडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई.
- “तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील; आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न.
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.