धरणगाव l प्रतिनिधी –
धरणगाव : तालुक्यातील पत्रकार संघटनेचे सदस्य व बाभुळगाव येथील पत्रकार विकास पाटील यांची मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी विकास पाटील तर खर्दे येथील पत्रकार राजू बाविस्कर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. आजपावेतो श्री.पाटील व श्री.बाविस्कर यांनी समाजाच्या हितासाठी, भारतीय संविधानाला अभिप्रेत शास्वत विकासासाठी, सामाजिक न्याय हक्कांसाठी, संरक्षणासाठी, प्रशासकीय बेजबाबदारपणा, अन्यायाच्या विरूद्ध वाचा फोडणे,
त्याचप्रमाणे पत्रकारिता क्षेत्रातून उपेक्षित, वंचित व दुर्लक्षितांच्या प्रश्नांना सामोरं जावून वाचा फोडण्याच्या कामातून आणि विवीध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेत मानव सेवा सुरक्षा ट्रस्टचे संस्थापक,अध्यक्ष गजानन इंगळे यांच्या आदेशाने सचिव अरुण पांडव, राज्य पदाधिकारी सौ. संगीताताई साबणकर, वसंत घायाळ, वैभव रौदळ, प्रकाश तांबळे, राजेंद्र गिरी, राजेंद्र कुमार ठाकूर, ॲड. किशोर पांचाळ, राजेंद्र तायडे, ज्योतीताई बावस्कर, रानीताई पवार, योगिताताई टिपणीस आदींसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मानव सेवा सुरक्षा ट्रस्टच्या माध्यमातून उपेक्षित, दुर्लक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकारी विकास पाटील व राजू बाविस्कर यांनी विश्वास व्यक्त केला. सदरील नियुक्तीबद्दल जळगांव जिल्ह्यासह, धरणगाव तालुका परिसरातून व पत्रकार संघटनेकडून शुभेच्छा व अभिनंदन करण्यात येत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






